Picture
अण्णाभाऊ साठे

 

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे (१ ऑगस्ट१९२० - १८ जुलै१९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगडय़ा तमाशाला 'लोकनाट्य` ही बिरुदावली शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिली. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले.

जीवन

१ ऑगस्ट१९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.

कार्य

अण्णाभाऊ लावण्या, शाहिरीपोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णाभाऊ साठे यांची वगनाटयेही अत्यंत महत्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णाभाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपारिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णाभाऊंनी स्वीकारले. तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णाभाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्टशेटजींचे इलेक्षनबेकायदेशीरमाझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?मूक मिरवणूकलोकमंत्र्यांचा दौराखापर्‍या चोरबिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.


कारकीर्द

[संपादन] कादंबरीवर आधारित चित्रपट

अनुक्रमांक↓ कादंबरी↓ चित्रपट↓ संस्था↓
वैजयंता वैजयंता १९६१ रेखा फिल्म्स
आवडी टिळा लावते मी रक्ताचा १९६९ चित्र ज्योत
माकडीचा माळ डोंगरची मेना १९६९ विलास चित्र
चिखलातील कमळ मुरली मल्हारी रायाची १९६९ रसिक चित्र
वारणेचा वाघ वारणेचा वाघ १९७० नवदिप चित्र
अलगूज अशी ही सातार्याची तर्हा १९७४ श्रीपाद चित्र
फकिरा फकिरा चित्रनिकेतन

[संपादन] प्रकाशित साहित्य

[संपादन] कादंब-या

अनुक्रमांक↓ नाव↓ आवृत्ती↓ प्रकाशन संस्था↓
आग विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
आघात
अहंकार् विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
अग्निदिव्य विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
कुरूप विद्यार्थीगगह प्रकाशन, पुणे
चित्रा विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
फुलपाखरू विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
वारणेच्या खो-यात विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
रत्ना विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
१० रानबोका विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
११ रूपा विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
१२ संघर्ष विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
१३ तास विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
१४ गुलाम चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ ठासलेल्या बंदुका
१७ जीवंत काडतूस
१८ चंदन चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
१९ मूर्ती चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
२० मंगला चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
२१ मथुरा चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
२२ मास्तर चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
२३ चिखलातील कमळ चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
२४ अलगूज
२५ रानगंगा
२६ माकडीचा माळ
२७ कवड्याचे कणीस
२८ वैजयंता
२९ धुंद रानफुलाचा
३० आवडी
३१ वारणेचा वाघ
३२ फकिरा
३३ वैर्
३४ पाझर
३५ स्ैरसोबत

[संपादन] कथासंग्रह

[संपादन] नाटके

अनुक्रमांक↓ नाव↓ आवृत्ती↓ प्रकाशन संस्था↓
बरबाद्या कंजारी प्रथम आवृत्ती विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
चिरानगरची भुतं प्रथम आवृत्ती
निखारा
नवती
पिसाळलेला माणूस
आबी दुसरी आवृत्ती
फरारी
भानामती
लाडी दुसरी आवृत्ती
१० क्रुष्णा काठच्या कथा
११ खुळंवाडी
१२ गजाआड पाचवी आवृत्ती
१३ गुर्हाळ
अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
इनामदार प्रथम आवृत्ती, मे १९५८ चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
पेंग्याचं लगीन
सुलतान

[संपादन] शाहिरी

अनुक्रमांक↓ नाव↓ आवृत्ती↓ प्रकाशन संस्था↓
शाहिर दुसरी आवृत्ती १९८५ मनोविकास प्रकाशन, मुंबई

[संपादन] तमाशा

अनुक्रमांक↓ नाव↓ आवृत्ती↓ प्रकाशन संस्था↓
अकलेची गोष्ट चद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
खापर्या चोर
कलंत्री
बिलंदर बुडवे
बेकायदेशीर
शेटजीचं इलेक्शन
पुढारी मिळाला
मूक मिरवणूक्
माझी मुंबई
१० देशभक्त घोटाळे विद्यार्थीग्रूह प्रकाशन, पुणे
११ दुष्काळात तेरावा
१२ निवडणूकीतील घोटाळे
१३ लोकमंत्र्यांचा दोरा
१४ पेंग्याचं लगीन

[संपादन] प्रवासवर्णने

अनुक्रमांक↓ नाव↓ आवृत्ती↓ प्रकाशन संस्था↓
माझा रशियाचा प्रवास सुरेश एजन्सीज ,पुणे

[संपादन] प्रसिद्ध पोवाडे

अनुक्रमांक↓ नाव↓ आवृत्ती↓ प्रकाशन संस्था↓
नानकीन नगरापुढे
स्टलिनग्राडचा पोवाडा
बर्लिनचा पोवाडा
बंगालची हाक
पंजाब-दिल्लीचा दंगा
तेलंगणाचा संग्राम
महाराष्ट्राची परंपरा
अमरनेरचे अमर हुतात्मे
मुंबईचा कामगार
१० काळ्याबाजाराचा पोवाडा